नर्मदा नदी
नर्मदा नदी : (रेवा, अमरजा, मैकलकन्या इ.) उत्तर भारत व दख्खन पठार यांच्या सीमेवरील खचदरीतून पश्चिमेकडे वाहणारी नदी. लांबी १,३१० किमी. व जलवाहन क्षेत्र ९८,४२० चौ. किमी. ही मध्य प्रदेश राज्यातील मैकल पर्वतश्रेणीच्या अमरकंटक पठारावर, सु. १,०५७ मी. उंचीवर एका झऱ्यातून उगम पावून त्या राज्यातून १,०७८ किमी. वाहते.